क्रिकेट जगतात नेहमीच काळजीचा सूर उठायचा कि लाडक्या सचिन नंतर कोण? खर तर ह्याचं उत्तर
स्वतः सचिन नेच दिले होते कि माझे रिकॅार्डस् विराट तोडू शकतो आणि हे सत्य हि ठरत आहे, विराट
नवीन रन मशीन बनला आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंड विरुध्द ची मालिका 2-1 ने खिश्यात
तर घातलीच. परंतु ह्या मालिकेत अनेक रिकॅार्डस् सुद्धा झाले. सगळ्यात कमी डावात 9000 धावा पूर्ण
करणारा विराट कोहली हा जगातला पहिला खेळाडू ठरला. सचिन तेंडूलकर ला 235 डाव लागले होते तर
ए.बी. डिव्हीलीयर्सने 205 डावात हि करामत केली होती. एका कॅलेंडरवर्षात सर्वाधिक 1424 धावा करणाऱ्या
रिकी पोंटिंग ला सुद्धा कोहलीने एका वर्षात 1460 धावा करून मागे टाकले आहे. शिवाय 230 धावांच्या
पार्टनरशिप चा रिकॅार्ड कोहली आणि रोहित ने केला, व 200 च्या पार्टनरशिप चा रिकॅार्ड कोहलीने 11 वेळा
केला तर 147 धावा करून रोहित ने ह्या वर्षात 1000 धावा पूर्ण केल्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews